Banakaranja Marathon 2026
Banakaranja Marathon 2026
About The Event
Banakaranja Marathon 2026 is a community running event organized with the objective of promoting health, fitness and an active lifestyle. The event will provide an opportunity for runners and fitness enthusiasts to participate in a professionally organized running event in Banakaranja.
The event will feature 5 KM and 3 KM race categories and aims to encourage people, especially youth, to adopt running and regular physical activity as part of a healthy lifestyle.
Events:
5K Run
Race Distance: 5 KM
Age Eligibility: 10 Years & Above
Race Fee: ₹199 per participant
Race Description: A community marathon organized to promote fitness, health, running culture and social awareness among people of all backgrounds. The 5 KM race is open to participants aged 10 years and above.
Last Day of Entry: 23/09/2026
Participant Benefits: Certificate
3 KM Run
Race Distance: 3 KM
Age Eligibility: 10 Years & Above
Race Fee: ₹150 per participant
Race Description: A 3 KM community run designed to encourage fitness, healthy living and participation in running activities.
Last Day of Entry: 27/09/2026
4 ऑक्टोबर 2026
रविवार
5 KM | 3 KM
आयोजक
स्वराज्य युवा मंच
ओमकार योग संस्था अंबा जोगाई
सहकार्य
जिव्हाळा ग्रुप, समता ग्रुप
अध्यक्ष: अध्यक्ष बंडू नाना लांब
उपाध्यक्ष: दत्ता लांब
🏆 आकर्षक बक्षिसे 🏆
फिटनेस ओपन (5 KM)
🥇 प्रथम – ₹6000
🥈 द्वितीय – ₹4000
🥉 तृतीय – ₹3000
मेल ओपन (5 KM)
🥇 प्रथम – ₹6000
🥈 द्वितीय – ₹4000
🥉 तृतीय – ₹3000
शालेय गट - गर्ल्स (3 KM)
🥇 प्रथम – ₹3000
🥈 द्वितीय – ₹2000
🥉 तृतीय – ₹1000
शालेय गट - बॉईज (3 KM)
🥇 प्रथम – ₹3000
🥈 द्वितीय – ₹2000
🥉 तृतीय – ₹1000
ओपन फी (नोंदणी शुल्क)
5 KM – ₹199
3 KM – ₹150
नोंदणी ऑनलाइन व ऑफलाइन उपलब्ध
शालेय गटासाठी
मोफत नोंदणी (एंट्री)
इयत्ता : 8 वी, 9 वी, 10 वी
प्रमाणपत्र
प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देण्यात येईल.
रिपोर्टिंग टाइम
सकाळी 6:00 वा.
स्टार्ट टाइम
सकाळी 6:30 वा.
स्थान
बनकरंजा, ग्रामपंचायत समोर
मॅरेथॉन स्टार्ट पॉईंट :
बनकरंजा हायस्कूल, बनकरंजा
राहण्याची सोय
बाहेरून सर्व सहभागींची राहण्याची सोय केली जाईल.
START POINT & FINISHING POINT
बनकरंजा हायस्कूल, बनकरंजा
BANKARANJA HIGH SCHOOL, BANKARAN
वयोमर्यादा व कॅटेगरी
- ही स्पर्धा Open Category मध्ये आयोजित करण्यात येत आहे.
- Open Category साठी कोणतीही Age Category (वयोगट) ठेवण्यात आलेली नाही.
- 5 KM Open आणि 3 KM Open मध्ये पात्रतेनुसार सर्व स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
- शालेय गटासाठी स्वतंत्रपणे इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येईल.
- बक्षिसांसाठी पात्र ठरणाऱ्या स्पर्धकांनी आयोजकांनी मागितल्यास वैध ओळखपत्र/वयाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील.
Tickets
The Route
Banakaranja High School
Banakaranja, Taluka Kej, District Beed, Maharashtra, Bankaranja, Maharashtra, 431123
Event Terms
Registration & Eligibility ⌃
स्पर्धकांसाठी नियम व अटी
1. प्रत्येक स्पर्धकाने ऑनलाइन/ऑफलाइन नोंदणी करताना अचूक व पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
2. नोंदणी केलेल्या स्पर्धकाने दिलेल्या Bib Number नुसारच स्पर्धेत सहभागी व्हावे.
3. 5 KM गटासाठी वय 18 वर्षे व त्यापुढे आणि 3 KM गटासाठी वय 16 वर्षे व त्यापुढे असावे.
4. शालेय गटातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वी यांच्यासाठी मोफत नोंदणी उपलब्ध आहे.
5. प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या दिवशी सकाळी 6:00 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे.
6. स्पर्धेची स्टार्ट टाइम सकाळी 6:30 वाजता आहे. उशिरा येणाऱ्या स्पर्धकाची जबाबदारी आयोजकांची राहणार नाही.
7. स्पर्धकाने Bib Number छातीच्या पुढील बाजूस स्पष्टपणे लावणे आवश्यक आहे.
8. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने किंवा दुसऱ्या स्पर्धकाचा Bib Number वापरून धावल्यास स्पर्धक अपात्र ठरवला जाईल.
9. स्पर्धेदरम्यान आयोजक, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक व अधिकृत अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
10. ठरवलेल्या मार्गावरूनच धावणे आवश्यक आहे. शॉर्टकट किंवा चुकीचा मार्ग वापरल्यास स्पर्धक अपात्र ठरू शकतो.
11. स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक, भांडण, धक्काबुक्की किंवा इतर स्पर्धकांना अडथळा निर्माण केल्यास स्पर्धकाला स्पर्धेतून बाद केले जाऊ शकते.
12. स्पर्धकाने स्वतःच्या आरोग्याची व शारीरिक क्षमतेची खात्री करूनच स्पर्धेत सहभागी व्हावे.
13. कोणतीही दुखापत, अस्वस्थता किंवा वैद्यकीय अडचण जाणवल्यास त्वरित वैद्यकीय पथकाची मदत घ्यावी.
14. आयोजकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही वाहनाचा स्पर्धेच्या मार्गावर वापर करू नये.
15. प्लास्टिक, कचरा किंवा इतर वस्तू रस्त्यावर फेकू नयेत. परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक स्पर्धकाची जबाबदारी आहे.
16. स्पर्धेतील बक्षिसासाठी पात्र ठरणाऱ्या स्पर्धकांना आवश्यक असल्यास वयाचा पुरावा व ओळखपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
17. चुकीची माहिती, चुकीचे वय किंवा खोटी कागदपत्रे आढळल्यास स्पर्धकाला बक्षीस व स्पर्धेतून अपात्र ठरवले जाऊ शकते.
18. बक्षिसे देताना आयोजकांचा निर्णय व अधिकृत निकाल अंतिम राहील.
19. स्पर्धेचा निकाल अधिकृत टाइमिंग/निकाल प्रणाली व आयोजकांच्या नोंदीनुसार निश्चित केला जाईल.
20. प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आयोजकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
21. नोंदणी शुल्क भरल्यानंतर नोंदणी रद्द करणे किंवा शुल्क परत मिळण्याबाबतचा निर्णय आयोजकांच्या नियमांनुसार राहील.
22. नोंदणी केलेली एंट्री दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यास आयोजकांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
23. स्पर्धेच्या मार्गात किंवा वेळेत प्रशासन, हवामान, सुरक्षा किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
24. नैसर्गिक आपत्ती, खराब हवामान, शासकीय आदेश किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे स्पर्धा स्थगित/रद्द झाल्यास आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
25. स्पर्धेदरम्यान सहभागी झालेल्या स्पर्धकाचे फोटो/व्हिडिओ आयोजकांकडून मॅरेथॉनच्या प्रचारासाठी वापरले जाऊ शकतात.
26. स्पर्धकाने आयोजक, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक, पोलीस व इतर संबंधित कर्मचाऱ्यांशी सहकार्य करणे आवश्यक आहे.
27. स्पर्धेशी संबंधित कोणत्याही बाबतीत आयोजकांचा अंतिम निर्णय सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहील.
महत्त्वाची सूचना
स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचूनच नोंदणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकाला कोणतीही पूर्वसूचना न देता स्पर्धेतून अपात्र ठरविण्याचा अधिकार आयोजकांना राहील.
Event Terms & Conditions
1. Participants must provide correct personal information during registration.
2. Participants must follow the instructions issued by the event organizers and volunteers.
3. Participants must follow all safety and traffic-related instructions during the event.
4. The organizer reserves the right to make necessary changes to the event schedule, route or other arrangements due to unavoidable circumstances.
5. Registration fees are subject to the applicable entry processing/payment gateway charges.
6. The 8% entry processing fee will be borne by the participant and added to the applicable entry fee.
7. Registration once confirmed will be subject to the event's cancellation/refund policy.
8. Participants must meet the specified age eligibility criteria for their selected race category.
9. The organizer's decision regarding event management and race-related matters shall be final.